Monday, January 23, 2017

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे

भारतरत्न पुरस्कार मिळवणारे

भारतरत्न पुरस्कार हा भारताचा सर्वाच्च नागरी सन्मान आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रपती कडून दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. 1954 साला पासून हा पुरस्कार साहित्य,कला,सामाजिक सेवा,विज्ञान या क्षेत्रात अतूलनिय कामगीरी करणाऱ्या व्यक्तिला देण्यात येतो.1955 साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली. त्यानंतर 12 जणांना मरणोपरांत(मेल्या नंतर) भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत 42 जणांना हा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते 2-फेब्रुवारी-1954 साली दिला गेला.

या पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळ पानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व त्याच्याखाली ‘भारतरत्न’लिहलेला शब्द असतो व दुसऱ्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह असते. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही.पण हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार असतो.

No comments:

Post a Comment