Monday, January 23, 2017

आवाजी मतदान म्हणजे काय?



आवाजी मतदान म्हणजे काय?

मित्रांनो महाराष्ट्र विधान सभेत आवाजी मतदानाने विश्वास समर्थन प्रस्ताव मंजूर करण्यात आला. चला आता जाणून घेवू या कि आवजी मतदान हा काय प्रकार आहे . साधारणत: एखाद्या विधेयकावर आमदारांनी मांडलेल्या सूचना किंवा प्रस्तावावर आवाजी मतदान घेण्यात येते. या प्रकारच्या मतदानात आमदार त्यांचा होकार किंवा नकार, होय किंवा नाही हे बोलून सांगतात.  हि मतदान पद्धतीतील सर्वात सोपी व सुलभ पद्धत आहे.
ह्या पद्धतीत सभापती प्रस्तावावर सभागृहातील सभासदांना त्यांचा होकार किंवा नकार होय किंवा नाही म्हणून सांगावयास लावतात. आधी ते होकार असणार्यांना विचारतात व नंतर नकार असणार्यांना त्यांचे मत विचारतात.
त्यानंतर ते त्यांचा ढोबळ मानाने घेतलेला निर्णय सभागृहाला देतात. हि मतदान पद्धती सदोष आहे व अचूक निर्णय होईलच याची खात्री नसते विशेषत: जेव्हा हो आणि नाही म्हणणाऱ्यांची संख्या जवळपास सारखीच असते. अशा स्थितीत एखाद्या सदस्याने मागणी केल्यास मतविभागणी द्वारे किंवा इतर पद्धतीने मतदान करण्याची घटनेत तरतूद आहे.
आवाजी मतदानात किती मते मिळाली याची नोंद कामकाजात केली जात नाही मात्र इतर पद्धतीच्या मतदान पद्धतीत मिळालेल्या मतांची नोंद केली जाते.
भारताखेरीज हि पद्धत अमेरिका व इंग्लंड मध्ये वापरण्यात येते . अमेरिकेत ९५ % विधेयके या पद्धतीनेच संमत करण्यात येतात.
भारतात हि पद्धती लोकसभा, राज्यसभा व घटक राज्यांच्या विधानसभेत विधेयक संमत करण्यास वापरली जाते.
हि पद्धती जेव्हा सभागृहात मतैक्य नसते तेव्हा वापरली जाते. तेलंगाणा राज्याला २९व्या राज्याचा दर्जा देण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात आला.
१४ ऑगस्ट २०१४ रोजी राज्यसभेने न्यायाधीशांच्या नेमणुकीच विधेयक आवाजी मतदान पद्धतीने संमत केले होते
१२ नोव्हेंबर २०१४ रोजी भाजपा ने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने संमत केला , शिवसेना व कॉंग्रेसने या बाबत प्रश्नचिन्ह उभे केले असून मतविभागणी ची मागणी केली

No comments:

Post a Comment