Tuesday, January 31, 2017

आर्थिक सर्वेक्षणातील ठळक मुद्दे:

आर्थिक सर्वेक्षणातील ठळक मुद्दे:
• २०१७ – १८ या आर्थिक वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा (जीडीपी) विकासदर ६.७५ वरून ७.५ टक्के राहण्याचा अंदाज
• नागरी उड्डाण, बँकिंग, खते या क्षेत्रांत खासगीकरणाची गरज
• कापड आणि लेदर क्षेत्राला प्रतिस्पर्धी बनवण्यासाठी कामगार आणि कर धोरणांमध्ये सुधारणांची आवश्यकता
• चालू वर्षात सकल राष्ट्रीय उत्पादनाचा विकासदर ७.१ टक्के
• चालू वर्षात कृषी क्षेत्राचा विकास दर ५.२ टक्के
• औद्योगिक क्षेत्राचा विकास दर ५.२ टक्के इतका राहिला, औद्योगिक विकासात २.२ टक्क्यांची घट
• चालू आर्थिक वर्षात पहिल्या सहामाहीमध्ये चालू खतांमधील घट ०.३ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिला
• किरकोळ महागाई दर गेल्या तीन वर्षांत नियंत्रणात
• पुढील आर्थिक वर्षात जीडीपी विकास दरावर नोटाबंदीचा परिणाम होण्याची शक्यता
• पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतून मोठ्या प्रमाणात रोकड प्राप्त होणार
• सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न योजनेमुळे जीडीपीवर चार ते पाच टक्के आर्थिक भार पडण्याचा अंदाज
• यावर्षी सरकार वित्तीय तुटीतील तोटा जीडीपीच्या ३.५ टक्के ठेवण्यास कटिबद्ध
• भारताचा जीडीपी विकास दर चीनपेक्षा अधिक
• नोटाबंदीचा परिणाम थोड्या कालावधीपुरता असेल. पण त्याचा फायदा दीर्घकालीन
• जीएसटीच्या माध्यमातून आर्थिक फायदे प्राप्त होण्यासाठी थोडा कालावधी लागेल
• एप्रिलपर्यंत चलनटंचाई संपुष्टात आणण्याचे प्रयत्न
• अप्रत्यक्ष करांच्या संकलनात एप्रिल-नोव्हेंबर २०१६ या कालावधीत २६.९ टक्क्यांची वाढ
• निर्यात ०.७ टक्क्यांच्या वाढीसह १९८.८ अब्ज अमेरिकी डॉलरच्या स्तरावर पोहोचली
• २०१६-१७ (एप्रिल – डिसेंबर) या कालावधीत आयात ७.४ टक्क्यांनी घटून २७५.४ अब्ज डॉलरवर स्थिरावली
• २०१६-१७ या आर्थिक वर्षात सेवा क्षेत्रात वृद्धी दर ८.९ टक्के राहण्याचा अंदाज

No comments:

Post a Comment